नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: बदलाच्या विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची पहिली बैठक मुंबईत
By Admin 2025-02-24
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
- ३ मार्चला होणाऱ्या बैठकीला सर्वपक्षीय खासदार व आमदार राहणार उपस्थितीत
- आ. सत्यजीत तांबे यांनी दिली माहिती
प्रतिनिधी,
पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. मात्र, त्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांमुळे सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून 3 मार्च 2025 रोजी मुंबई येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय व इतर मतभेद विसरून या भागाच्या विकासासाठी एकत्र येणार आहेत. त्याचसोबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे आ. तांबेंनी सांगितले.