संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू
By Admin 2025-03-11
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
प्रशासनाची विविध गटाशी चर्चा, पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे
संगमनेर - संगमनेर शहरात बस स्थानकावर शिवजयंती उत्सवा साजरा करण्यावरून काँग्रेस व शिवसेनेमध्ये झालेल्या वादातनंतर विविध गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.सोमवारी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.
दरम्यान बस स्थानकावर शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवत वादाच्या ठिकाणी दोन पोलीस व्हॅन उभ्या उद्या करण्यात आल्या आहे. सोमवारी (दि १०) दिवसभर बस स्थानक परिसरात बंदोबस्त तैनात करून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते. कोणत्याही पदाधिकाऱ्याला अथवा कार्यकर्त्याला वादाच्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला होता. पोलीस प्रशासन काँग्रेस शिवसेना व इतरही गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. हा वाद टाळावा व यातून मार्ग निघावा यासाठी सोमवारी चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही गट एकाच ठिकाणी शिवजयंती उत्सवाचा देखावा करण्यावर ढाम असल्याने वाद टाळण्यासाठी पोलीस मध्यस्थी करत आहे. या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना तटस्थ आहे. त्यांचे विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक पुढे आले नाही. शिवजयंती उत्सवात मात्र ते सहभागी होणार आहे.