रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची धडक कारवाई मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली. By Admin 2025-03-24

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची धडक कारवाई मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडे कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली असून या मोहिमेंतर्गत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संजय पेखळे , प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे , कर निरीक्षक दत्तू साळवे , सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ ,यांसह नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले ६ वसुली पथके नियुक्त केले असून या पथकाद्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती , नळ कनेक्शन बंद करणे यांसारख्या विविध कारवाई करण्यात येत आहे.

      विशेष वसुली मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शहरातील विविध भागातील ५ मालमत्ता धारकांच्या एकूण ९ लाख ८ हजार,९७१ /- रुपयांच्या थकबाकी पोटी मालमत्ता जप्त करण्यात आलेली असून शहरातील विविध भागातील सुमारे ९ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे. सदरच्या कारवाईमध्ये संजय पेखळे ,प्रल्हाद देवरे ,बाजीराव नवले, प्रणोती पवार , तुकाराम कानसकर , यांसह प्रदीप मावलकर, साजिद पटेल, वैष्णवी गडाख, ओंकार सहाणे, सुनील हामंद, जालिंदर हिरे , वसंत मेहेर ,भीमाशंकर वर्पे,रमेश ताजणे , कुणाल चांगरे, मच्छिंद्र काठे ,अल्ताफ शेख, विजय अभंग आदी सहभागी होते.

Special Offer Ad