रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक By Admin 2025-04-09

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक

संगमनेर (प्रतिनिधी)--महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय असलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी  डीपेक्स 2025 या टेक्निकल प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळविला  असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्ही.बी धुमाळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रा. धुमाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त  सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांबरोबर विविध राष्ट्रीय कंपन्याशी टायप करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा याकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिक कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील  अपूर्वा आडेप, सानिया भोईर ,उत्कर्ष भामरे या विद्यार्थिनींनी डीपेक्स 2025 या राज्यस्तरीय टेक्निकल प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना या स्पर्धेमध्ये दहा हजार रुपयांची रोप बक्षीस ट्रॉफी व सन्मानपत्र देण्यात आले आहे. 

Special Offer Ad