संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड
By Admin 2025-04-17
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर
व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड
संगमनेर (प्रतिनिधी) " संगमनेर परिसरातील उद्योग व्यवसायांच्या विकासाची गंगोत्री म्हणून लोकमान्यता मिळालेल्या मर्चंट बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटींचे भव्य लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बँकेवर मनापासून प्रेम करणारे सर्व घटकांच्या साथीने हा गोवर्धन पर्वत उचलण्यामध्ये नक्कीच यश मिळेल" असा विश्वास संगमनेर मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमन उद्योगपती राजेश मालपाणी यांनी येथे व्यक्त केला.
जिल्हा उपनिबंधक संतोष मधुकर कोरे व सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे दोघांचीही एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनगर उपनिबंधकांनी घोषित केले. यावेळी टाळ्यांचा जोरदार कडकडाट होऊन मालपाणी आणि नावंदर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. व्यासपीठावर मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे मावळते व्हाईस चेअरमन मुकेश कोठारी यांच्यासह प्रकाश राठी, संतोष करवा, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, महेश डंग, सम्राट भंडारी, वैभव दिवेकर, जुगलकिशोर बाहेती, रविंद्र रत्नाकर पवार, शाम भडांगे, उषा नावंदर, किर्ती करवा, सीए श्री. प्रविण दिड्डी,