श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे संगमनेरात उस्फुर्त स्वागत     |      अज्ञात इसमाने दोन चारचाकी वाहने पेटविली     |      पावसाने शेतकरी हवालदिल; संगमनेर तालुक्यात २२ घरांची पडझड, पत्रे उडाले, तारा तुटल्या     |     
दरोड्याचा कट उधळला; संगमनेर शहरात ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, २ अटकेत By Admin 2025-05-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




दरोड्याचा कट उधळला; संगमनेर शहरात ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, २ अटकेत

संगमनेर, दि. २१ मे २०२५

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संगमनेर शहरात दरोड्याचा कट उधळून लावला आहे. २१ मे २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सावजी हॉटेलसमोरील पुणे-नाशिक हायवे ब्रीजखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी रोहन अनिल अभंग (वय २७, रा. तांबे हॉस्पिटलसमोर, देवाचा मळा, संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि सोनू ऊर्फ अथर्व संतोष दुधाने (वय १९, रा. हॉस्पिटलसमोर, देवाचा मळा, संगमनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांना पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर साथीदार प्रेम विजय वाल्हेकर, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर, जब्या वाल्हेकर (सर्व रा. अठरा पगड, गुंजाळवाडी, संगमनेर) आणि अशफाक शेख (रा. अकोले नाका, संगमनेर) फरार झाले आहेत.पोलिसांनी घटनास्थळावरून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि साहित्य जप्त केले आहे. यामध्ये ६० सेमी लांबीची आणि ३.५ सेमी रुंदीची लोखंडी तलवार, ४१ सेमी लांबीचे आणि ४.५ सेमी रुंदीचे दोन कोयते, एक छोटा मनी पान्हा, एक स्टीलचे फायटर, एक लोखंडी पक्कड, दोन मोबाईल (एक विवो Y58, किंमत १५,००० रुपये आणि एक विवो १९३८, किंमत १५,००० रुपये), आणि लाल-काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. १७ सीपी ६१८०, किंमत ७०,००० रुपये) असा एकूण सुमारे १,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल शशी दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मोरे आदींचा समावेश होता. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला घटनास्थळी संशयास्पद हालचाली आढळल्याने पथकाच्या चौकशीत हा प्रकार समोर आला. दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर अंधाराचा फायदा घेऊन चौघे पळून गेले. घटनेचा पुढील तपास स्वतः उपनिरीक्षक अभंग करत आहेत.