राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ खताळ By Admin 2025-10-18

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नगरोत्थान अभियानाच्या विशेष रस्ता अनुदानातून होणार रस्त्यांची कामे संगमनेर शहर विकासाला मिळणार गती,

संगमनेर :प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील 21 रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

       संगमनेर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकरिता नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “नगरोत्थान महाभियान” योजनेतून संगमनेर शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर शहरासाठी दिलेल्या भरीव निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांचे आभार आमदार. खताळ पाटील यांनी आभार मानले आहेत .

Special Offer Ad