राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
सजवलेल्या बैलगाडीतून मजल दरमजल करत संगमनेर तालुक्यातील भाविक जेजुरीच्या दिशेने... By Admin 2025-02-11

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




सजवलेल्या बैलगाडीतून मजल दरमजल करत संगमनेर तालुक्यातील भाविक जेजुरीच्या दिशेने...

                              संगमनेर : 'चला जेजुरीला जाऊ, यळकोट यळकोट जय मल्हार,' असे म्हणत अनेक भाविक सजविलेल्या बैलगाडीतून जेजुरीच्या दिशेने निघाल्याचे चित्र संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळते आहे.दुसरीकडे खंडेरायाच्या जयजयगाराने महामार्ग दुमदुमून गेला होता.

काही दिवसांवर जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा आली आहे. त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी जात आहेत. नाशिकसह संगमनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी व दावडीच्या खंडोबाला जात आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक भाविक सजवलेल्या बैलगाडीतून जेजुरीच्या दिशेने जात आहेत. यावेळी बैलगाडीला कोपी सारखा गोल प्लास्टिक कागद बांधलेला, बैलांसाठी चारा आणि दोन ते तीन जण आत बसलेले असतात.

विशेष बाब म्हणजे बैलांनाही सजवलेले असते. बैलांच्या शिंगांना रंग, वर शेंबीला रंगीबेरंगी गोंडे, अंगावर झालर, गळ्यात घुंगरमाळा अशा पद्धतीने सजवलेले आहे. आमचे आजी-आजोबा जेजुरीला व दावडीच्या खंडोबाला जात होते. त्यामुळे ही परंपरा पहिल्यापासून चालत आली आहे. आता आम्ही गेल्या तीस वर्षांपासून खंडोबाच्या दर्शनाला जात असल्याचे भाऊसाहेब कारभारी रहाणे या भाविकाने सांगितले. जवळपास शंभरच्या वर बैलगाड्यांतून भाविक जेजुरीच्या दिशेने निघाले आहेत. ठिकठिकाणी या भाविकांचे ग्रामस्थ स्वागत करत आहेत.

Special Offer Ad