राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
पुणे- नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे आमदार अमोल खताळखताळ यांनी विधान भवनात हातात फलक घेऊन वेदले सरकारचे लक्ष By Admin 2025-12-09

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पुणे- नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे आमदार अमोल खताळखताळ यांनी विधान भवनात हातात फलक घेऊन वेदले सरकारचे लक्ष

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी 'पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे' या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या

शिर्डी मार्गे मार्गाला विरोध, संगमनेरकरांमध्ये संताप – नारायणगाव जवळील 'जीएमआरडी' (दुर्बीण) च्या तांत्रिक अडथळ्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गे करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संगमनेरकरांमध्ये तीव्र संताप आहे. या मार्गामुळे संगमनेर आणि परिसराचा विकास होणार असल्याने स्थानिकांची मागणी संगमनेर मार्गासाठीच आहे.

आमदार खताळ यांनी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते.

आंदोलनानंतर बोलताना आमदार खताळ यांनी जनआंदोलनाची तयारी दर्शवित ते म्हणाले, हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच झाला पाहिजे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हा मार्ग धोकादायक असल्याचे अचानक जाहीर केले. यासाठी कोणी आडकाठी आणत असेल, तर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याशी चर्चा झाली असून, राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल.



Special Offer Ad