रमेशराव देशमुख यांचे निधन     |      घारगाव शिवारात आढळलेल्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटली आई वडील सह वाहन चालकालाही अटक     |      पुणे- नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे आमदार अमोल खताळखताळ यांनी विधान भवनात हातात फलक घेऊन वेदले सरकारचे लक्ष     |      पुणे- नाशिक महामार्गावर पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न बाप-लेखावर गुन्हा दाखल अवैध धंद्यावर कारवाईची मागणी     |      नासिक- पुणे रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे संगमनेर करांमध्ये प्रचंड संतापाची लाट जन आंदोलन करण्याची तयारी     |      संगमनेर रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन पेटणार...     |      विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |     
घारगाव शिवारात आढळलेल्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटली आई वडील सह वाहन चालकालाही अटक By Admin 2025-12-09

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




घारगाव शिवारात आढळलेल्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटली आई वडिलांसह वाहन चालकालाही अटक

आई म्हणजे वात्सल्य आणि पिता म्हणजे आधार. मात्र जेव्हा हेच जन्मदाते नियतीसमोर हार मानून क्रूरतेची हद्द गाठतात, तेव्हा संपूर्ण समाजाचे मनं हेलावते. गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.4) घारगावनजीकच्या मुळानदी पात्रातून असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. कडाक्याच्या थंडीत भल्या सकाळीच पुलाजवळील झुडपात तीन ते चार महिने वयाच्या निर्वस्त्र बालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडून संतापही निर्माण झाला होता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेतील बालकाच्या शरीरावर काही खुणाही आढळून आल्याने यामागे घातपाताचा संशयही व्यक्त होत होता. त्यातच या प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने घटना समोर आल्यापूर्वीच्या वाहनांचे विश्लेषण करुन मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावला असून या प्रकरणात चक्क मृत बालकाच्या जन्मदात्यांसह त्यांना सहाय्य करणाऱ्या वाहनचालकाला अटक केली आहे. या धक्कादायक प्रकरणात चिमुरड्या मुलाचा खून करण्यात चक्क आईचाही सहभाग आढळून आल्याने 'माता तु न वैरिणी' या परंपरेलाच धक्का बसला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात गुरुवारी (ता. 4) घारगावजवळील मुळानदीवर असलेल्या पुलाखाली चार ते पाच महिन्याचे अर्भक असल्याची माहिती घारगाव पोलिसांना समजली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी मृतावस्थेत आढळलेल्या बाळाच्या शरीरासह गळ्याभोवती जखमाही आढळून आल्याने त्याचा घातपात करुन विल्हेवाट लावण्याच्या इराद्याने त्याचा मृतदेह मुळानदीत फेकून दिला असावा इतपत संशयापर्यंत पोलीस पोहोचले. मात्र मृत बाळाच्या शरीरावर ओळख पटवण्याबाबत कोणतीही ठळक खूण नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या.सदरचा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनीही त्याकडे गांभीर्याने पाहत स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार करुन धागेदोरे धुंडाळण्यास सुरुवात केली. या दरम्यान मृत अर्भक प्रत्यक्ष पाहण्यात आल्याच्या क्षणापासून त्या आधी मुळानदीच्या पुलावरुन गेलेल्या प्रत्येक वाहनाचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून संशयीत वाहनांवर लक्ष केंद्रीत करुन एका एका वाहनाचा संदर्भ जोडण्यात आला. त्याचवेळी खबऱ्यांचे जाळे निर्माण करुन या प्रकरणात काही सापडते का याचाही शोध सुरु झाला.चारही बाजूने तपास करुनही नेमकी माहिती हाती येत नव्हती, मात्र त्याचवेळी घटना उघडकीस येण्यापूर्वी मुळानदीचा पूल ओलांडणाऱ्या आणि मुंबईचा नोंदणी क्रमांक असलेल्या एका इर्टीगा वाहनावर पोलिसांचे लक्ष खिळले. मात्र नेमकी माहिती नसल्याने थेट कारवाईला मर्यादा आल्या. त्यामुळे पोलिसांनी 'त्या' वाहनाचा मालक राहात असलेला आव्हाना (ता. भोकरदन, जि.जालना) हा परिसर पिंजून काढल्यानंतर मृत बाळाबाबतची माहिती प्राप्त होवून काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याची माहितीही मिळाली. या माहितीचा माग काढीत असतानाच घारगावमधील अज्ञात अर्भक प्रकरणापर्यंत पोलीस पोहोचले.या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन महिने वयाच्या शिवांश उर्फ देवांश या अर्भकाचा खून केल्याप्रकरणी त्याचा पिता प्रकाश पंडित जाधव (वय 37), त्याची पत्नी व अर्भकाची जन्मदात्री कविता प्रकाश जाधव (वय 32) व त्यांना मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट भोकरदनहून घारगावमध्ये घेवून येणाऱ्या हरिदास गणेश राठोड (वय 32, तिघेही रा भीवपूर, पो. आव्हाना, ता. भोकरदन, जि.जालना) या तिघांनाही अटक केली आहे. या घटनेतील तीन महिन्याच्या शिवांशला असाध्य आजार झाला होता, त्यातून तो सावरण्याची शक्यता नसल्याने त्याच्या जन्मदात्यांनीच त्याचा गळा आवळून मृतदेह मुळानदीच्या परिसरात फेकून दिला होता.कोणताही पुरावा हाती नसतांना स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची एक एक कडी जोडीत प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांच्या तपास पथकात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महिला पोलीस भाग्यश्री भीटे यांचा समावेश होता.









Special Offer Ad