राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
संगमनेर दोन प्रभागात तिघांची माघार पालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागात एका जागेसाठी नऊ उमेदवार रणांगणात By Admin 2025-12-11

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात दोन प्रभागात तिघांची माघार पालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागात एका जागेसाठी नऊ उमेदवार रणांगणात

संगमनेर नगरपालिकेच्या २७प्रभागातील निवडणूक प्रक्रिया पार पडली. उर्वरीत तीन प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. बुधवारी ३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी १५ प्रभागांमध्ये एकूण ३० नगरसेवक इच्छुक आहेत. यात १५ महिला, पंधरा पुरुष व एक महिला नगराध्यक्षांसह ३१ उमेदवारांचा यात समावेश आहे. १५ प्रभागांतील २७जागांसह एक नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाग एक ब (पुरुष), दोन व (महिला) तर, १५ व (महिला) उमेदवाराचे अर्ज बाद करण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तीन प्रभागात नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. १० तारखेला माघारी, ११ तारखेला चिन्ह वाटप, २० तारखेला मतदान तर, २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. बुधवारी (दि.१०) रोजी अर्ज माघार देण्याच्या दिवशी प्रभाग १ ब मधील उमेदवार संकेत सुभाष लोंढे तर, प्रभाग १५ व मधील रेहाना सिराजोद्दीन शेख व सईदा गफ्फार शेख अशा एकूण ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे प्रभाग १ बमध्ये संगमनेर सेवा समितीविरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत रंगणार आहे. प्रभाग २ बमध्ये संगमनेर सेवा समिती, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग १५ बमध्ये ३ उमेदवार रणांगणात आहेत. येथे संगमनेर सेवा समिती व दोन अपक्ष अशी लढत होत आहे. दरम्यान, आज (गुरुवार दि.११) रोजी चिन्ह वाटप होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र मतमोजणी २१ तारखेला होणारा असल्यामुळे याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



प्रभाग क्रमांक १ १ व (पुरुष)  मधील एकाने तर, १५ व (महिला) मधील ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग २ बमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. ३ प्रभागांतील उमेदवारांना आज गुरुवारी (दि.११) चिन्ह वाटप केले जाणार आहे.



अरुण उंडे, निवडणूक निर्णय अधिकारी, संगमनेर



Special Offer Ad