दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
बोटा येथे १२ तारखेला राष्ट्रीय महामार्ग रोखणार
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील अचानक बदलाने अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. आक्रमक जनता पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको जनआंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
निवडणूक निर्णय अधिका