रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन By Admin 2026-01-24

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन

संगमनेर प्रतिनिधी शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर यांचे काल शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

राजकारण म्हणजे पदांची बेरीज नव्हे, तर विचारांची मशाल असते, हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला शिकवले. त्या मशालीला अखेरपर्यंत जपणारा, कोणत्याही सत्तासमीकरणांपुढे न झुकणारा आणि निष्ठेची किंमत शब्दांत नव्हे तर कृतीत मोजणारा शिवसैनिक म्हणजे कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर. आज तो कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे; आणि संगमनेरच्या चौकातील ते शांत, संयमी ओंकारेश्वर हॉटेल निशब्द झाले.शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा आवाज, आणि शिवसैनिक म्हणजे त्या आवाजातून संघर्षाचे रणशिंग फुंकणारे सैनिक .

 

आप्पासाहेब केसेकर हे त्या रणशिंगातील एक खडे सूर होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही सत्तेच्या दारात न वाकता त्यांनी शिवसेनेचा भगवा डोईवर नव्हे, तर रक्तात मिरवला. आंदोलन असो, मोर्चा असो वा संघटन बांधणी शिवसेनेच्या प्रत्येक कठीण टप्प्यावर आप्पासाहेब पुढे उभे राहिले.

 

आजच्या राजकारणात निष्ठा ही व्यवहाराच्या काट्यावर तोलली जाते; विचारांची जागा सोयीस्कर भूमिका घेतात. अशा काळात आप्पासाहेब केसेकर हे जुनी शिवसेना शाळा दाखवणारे कार्यकर्ते होते. 'बाळासाहेब म्हणाले म्हणून' हीच त्यांची अंतिम भूमिका होती. कुठल्याही पद, मान-सन्मान, निधी किंवा प्रसिद्धीपेक्षा त्यांनी संघटनेला आणि विचाराला

प्राधान्य दिले हीबाब आज दुर्मिळ होत चालली आहे.

สล็อตทดลอง

ทดลองเล่นสล็อต

สล็อต

pg

สล็อตเว็บตรง

Special Offer Ad