शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
संगमनेर मधील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली परिवहन मंत्र्यांची भेट By Admin 2025-03-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर मधील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली परिवहन मंत्र्यांची भेट

संगमनेर प्रतिनिधी 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, स्वतंत्र आरटीओ कार्यालय आणि एसटी बसेसच्या थांब्यांबाबत चर्चा झाली.

संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, सरकारने सकारात्मक निर्णय घेत जागा उपलब्ध करून दिली. मात्र, हे स्मारक अधिक भव्यदिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 

त्याचसोबत, संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे, ही नागरिकांची आणि स्थानिक प्रशासनाची प्रदीर्घ मागणी आहे. या पूर्वी मागणीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे स्वतंत्र आरटीओ कार्यालय न देता ‘कॅम्प ऑफिस’ मंजूर केले. मात्र, ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कॅम्प ऑफिस लवकरात लवकर सुरू करावे आणि सर्व तांत्रिक अडचणी दूर करून स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करावे, अशी ठोस मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी या बैठकीत केली.

सध्या रात्रीच्या वेळी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस संगमनेर शहरातील मुख्य बसस्थानकात थांबत नाहीत, त्यामुळे नागरिकांना महामार्गावर उतरावे लागते. शासनाने यापूर्वीच रात्री 9 वाजेनंतर सर्व बसेस संगमनेर बसस्थानकात थांबाव्यात, असा आदेश दिला आहे. मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तातडीने या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी आ. तांबेंनी केली.

Special Offer Ad