शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच By Admin 2026-01-15

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच

संगमनेर:-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. १३ रोजी गुंजाळवाडी येथील शिवसेनेचे निष्ठावंत मा. उपजिल्हा प्रमुख रावसाहेब गुंजाळ  यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. या बैठकीत पदाधिकारी व शिवसैनिकांशी थेट संवाद साधताना आपसातील मतभेद व मनभेद बाजूला ठेवा,

उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी केले.. आता फक्त शिवसेना ! असा स्पष्ट व आक्रमक संदेश देण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्कवर जमलेला जनसागर ही केवळ सभा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारी गर्जना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन अटळ असून, महाराष्ट्र नव्या ऊर्जेने जागा होत आहे, असे कोते म्हणाले.

पदाधिकारी नेमणुकांबाबत बोलताना कोते यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींचे निर्णय अंतिम असतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत असून, या दोन्ही बंधूंंकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे बदल हे पक्षासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार असून, त्याच जोरावर सत्तेवर भगवा झेंडा रोवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका युवाध्यक्ष अक्षय गुंजाळ यांनी आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, शिवतीर्थावर उसळलेला महासागर खूप काही सांगून गेला आहे. मुंबईपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या परिवर्तनातून नवीन नेतृत्व घडेल आणि खऱ्या शिवसैनिकांना संधी मिळेल, हे निश्चित असे त्यांनी सांगितले. आज बदलत असलेल्या राजकीय समीकरणांमागे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असल्याचे नमूद करत अक्षय गुंजाळ म्हणाले की, पक्षप्रमुखांनी दिलेले आदेश सर्वांना ला मान्य असून  जो निर्णय पक्षप्रमुख घेतील, तोच आमचा अंतिम निर्णय असेल. आम्ही कडवे शिवसैनिक आहोत एकनिष्ठ, एकजूट आणि लढवय्ये हीच आमची ओळख आहे असे ठामपणे सांगत त्यांनी आगामी प्रत्येक राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. नगर पालिकेतील निवडणुकांच्या धर्तीवर पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्येही शिवसेनेच्या माध्यमातून परिवर्तन घडणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब हासे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, हेवेदावे, गटबाजी आणि अहंकार बाजूला सारून पक्षाची वज्रमुठ आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. शिवसेनेची ताकद, भगवा झेंडा आणि शिवसैनिकांची निष्ठा यांच्या बळावर पंचायत समिती व जिल्हा परिषदांवर विजयाचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारच सर्वांनी व्यक्त केला. या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना पक्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. यावेळी उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, तालुका युवाध्यक्ष अक्षय गुंजाळ, युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), महिला आघाडीच्या उप जिल्हाध्यक्षा आशाताईं केदारी,सुनील देशमुख, प्रकाश क्षत्रिय, योगेश गुंजाळ, संदीप गुंजाळ,प्रकाश गायकवाड, रंगनाथ फटांगरे, भीमा पावसे,अमित फटांगरे,अशोक बडे,संजू सोनावणे







Special Offer Ad