नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना By Admin 2025-02-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




लोकनेते बाळासाहेब थोरात व कृती समितीच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले

संगमनेर (प्रतिनिधी)- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकसित ठरलेला संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी प्रशासनाच्या नावाखाली संगमनेर तालुका तोडण्याचा डाव जनतेने हाणून पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा दिला तर आ सत्यजित तांबे यांनीही मंत्रालयात पाठपुरावा केला .जनता ही रस्त्यावर उतरली आणि त्यातून आता महसूल मंडळाची फेररचना होणार आहे.

आश्वी बुद्रुक येथे प्रस्थापित अप्पर तहसील कार्यालयाच्या फेररचनेमध्ये संगमनेर शहराजवळील अनेक गावे जोडली आहेत. समनापुर व संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्यामध्ये समाविष्ट केले आहेत यामुळे 62 गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा कुटील डाव आखला होता मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक इशारा दिला. याचबरोबर जनता ही रस्त्यावर उतरली कृती समितीने आंदोलन केले तालुका बचाव कृती समिती आणि तालुक्यातील 62 गावांमधील जनता एकवटली. 

वेळोवेळी निदर्शने केली निवेदन दिली आणि अमर उपोषणाचा व आत्मदहनाचा इशाराही दिला. याचबरोबर प्रशासकीय पातळीवर माजी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे ही मंत्रालयात महसूल मंत्री यांची भेट घेतली 

कृती समितीने न्यायालयीन लढा लढण्याचा  इशारा दिला त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी माघार घेत आता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथे अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव होणार नाही असे सांगितलं आहे.

संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक परिवार म्हणून आहे हा तालुका एकवटला असून आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयास संगमनेर तालुक्यातील जनतेने आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.