विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग By Admin 2025-08-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर, दि. १८ ऑगस्ट, 

(प्रतिनिधी) स्वातंत्र्योत्सव सप्ताह निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संगमनेर शहरात ३०० फूट लांबीच्या तिरंग्यासह भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत तब्बल एक हजारांहून अधिक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

मालपाणी लॉन्स येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा संगमनेर स्टेडियमपर्यंत पार पडली. हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या माध्यमातून विद्यार्थी परिषदेकडून तरुणांमध्ये देशभक्तीची जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या पदयात्रेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर थोरात, विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख अरुण लेले सर व शहर मंत्री हर्ष खोल्लम आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण पदयात्रेमुळे शहर देशभक्तीच्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या रंगांनी दुमदुमून गेले.









Special Offer Ad