नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे By Admin 2025-08-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे

संगमनेर  : लाडकी बहीण योजनेचे हप्ते थोडेफार मागेपुढे झाले असले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील महायुतीच्या अजेंड्यावर आहे. सध्या थोडी तारेवरची कसरत करावी लागत असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे काल प्रथमच संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील जाणता राजा मैदानावर विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.

आमदार खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, आपली लढाई सत्तेसाठी – खुर्चीसाठी नसून, ज्यांनी आपल्याला खुर्चीवर बसवले त्यांच्यासाठी आहे. आमदार खताळ यांना इथल्या जनतेने मोठी संधी दिली असून, त्या संधीचे ते निश्चित सोने करतील. जनतेशी बेइमानी करणाऱ्यांना २०२२ मध्ये आपण बाजूला केले. त्यानंतरच्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यात जो विकास केला त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिली. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या लोकांना बहिणींनी २३२ नंबरचा जोडा हाणत घरी बसवले.

राज्यात महायुतीचे सरकार आले आहे हे अद्यापही महाविकास आघाडी मानायला तयार नाही. जनतेने त्यांना एवढा मोठा झटका दिलाय की ते त्यातून बाहेर पडायलाच तयार नाही. मत चोरी झाली म्हणततात मग गेल्या ५०-६० वर्षांत विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून यांनी किती चोऱ्या केल्या, हेही तपासले पाहिजे. ऑपरेशन सिंदूर, महादेव यावर संशय व्यक्त करणारे, वारकऱ्यांचा अपमान करणारे हिंदू असू शकत नाही. आमदार खताळ यांना निवडून देत इथली जनता खरी 'जायंट किलर' ठरली असून, त्यांच्या मागे आपण भक्कम उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये आमदार खताळ यांनी मंत्री एकनाथ शिंदे व राधाकृष्ण विखे यांनी दिलेली संधी आणि त्याला मिळालेल्या जनतेच्या साथीचे सोने करणार असल्याचे सांगितले. पुणे – नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे न्यावा, तालुक्यात एमआयडीसी मंजूर करावी, सुसज्ज रुग्णालयाबरोबरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वाढीव जागा द्यावी, पेमगिरीच्या शहागड किल्ल्याच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले.

संगमनेरमधील जनतेने चमत्कार घडवून आणत चाळीस वर्षांची इथली मक्तेदारी उलथवून टाकली. त्यामुळे या मतदारांचे दर्शन घ्यायला आपण येथे आलेलो आहोत. खताळ यांना हिणवणाऱ्यांच्या हाती जनतेने आता खुळखुळा दिला, असे सांगतानाच शिवाजी महाराज पुतळ्यासाठी वाढीव जागा देण्यासह एमआयडीसीची प्रक्रिया लगेच सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.