शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास
By Admin 2025-02-26
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास
संगमनेर : शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा बनाव ट्रक चालकानेच केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संबंधित चालकाने आळेफाटा (जि. पुणे) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्यात हद्दीतील असल्याने गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपास केला असता फिर्यादी ट्रकचालक यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले असून त्यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.