दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पिंपळगाव देपा, सायखिंडीसाठी टँकर मंजूर संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई; दरेवाडी, वरवंडीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल
संगमनेर तालुक्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. यामुळे सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या गावांसाठी टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, वरवंडी व दरेवाडी या दोन गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उन्हाळा सुरू होतात तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागते, मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी उशिरा टंचाई जाणवत आहे. २०२३ यावर्षीडिसेंबर महिन्यातच टँकर सुरू झाला होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये २ टैंकर सुरू करण्यात आले होते. पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट अखेर टैंकर सुरू होते, मात्र यंदा मार्चच्या सुरूवातीला टैंकर सुरू झाले नाही. सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांनी टँकरची मागणी केली होती. यानुसार या गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. दरेवाडी व वरवंडी गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. पंचायत समितीने तालुक्यातील यंदाची पाणी टंचाई लक्षात घेता, टंचाई आराखडा सादर केला आहे. तीन-तीन महिन्यांचे दोन भाग केले आहेत. जूनअखेर ६१ गावे व त्या गावांतर्गत वाड्यांना २० टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, असा अंदाज गृहीत धरून, टंचाई आराखडा सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजूरी दिली आहे.
३६ गावांना देणार पाणी!