नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाहीतर शिर्डी -अहिल्यानगर मधून जाणार
By Admin 2025-03-18
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाहीतर शिर्डी -अहिल्यानगर मधून जाणार
नाशिक : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष खास आहे. खरे तर पुणे ते नाशिक यादरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात आलेला नाही.
यामुळे पुणे ते नाशिक असा प्रवास करायचा म्हटलं की अजूनही रस्ते मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. पण भविष्यात आता पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार असून या दोन्ही शहरादरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे.
खरे तर हा रेल्वे मार्ग प्रकल्प 30 वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. अशातच आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या रूटमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसा असणार नवा रूट?
खरंतर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प ज्यावेळी प्रस्तावित करण्यात आला तेव्हा या रेल्वे मार्गाचा रूट नाशिक-संगमनेर-चाकण-पुणे असा निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून अखेरकार या प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
मात्र, आता पूर्वीच्या या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाही तर शिर्डी आणि अहिल्यानगरमधून जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.