अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले     |      संगमनेरमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये वाद, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुलेसह १० जणांवर गुन्हा दाखल!     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |     
कर्तव्य बजावतांना संगमनेरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा By Admin 2025-03-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कर्तव्य बजावतांना संगमनेरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-कश्मीरच्या तंगधार क्षेत्रात सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना एक दुर्दैवी घटना घडली.
गोळीबारात संगमनेरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
३४ एफ रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर असलेल्या रामदास यांचे पार्थिव काश्मीर खोऱ्यातून विमानाने मुंबईत आणले जाणार असून, बुधवार, २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता मेंढवण गावात लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रामदास हे नियंत्रण रेषेजवळ ऑपरेशनल ड्युटीवर तैनात होते, जिथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत त्यांनी शौर्य दाखवत प्रत्युत्तर दिले,
परंतु गोळी लागल्याने त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारात युद्धातील अपघातांसाठीच्या मानकांचे पालन केले जाईल.अत्यंत गरिबीतून लढत रामदास यांनी सैन्यदलात प्रवेश केला होता आणि देशसेवेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या बलिदानाने मेंढवणसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहिली जात आहे. "दोस्तो..साथीयों, हम चले, दे चले" अशा शब्दांत त्यांच्या या निर्गमनाला सलाम दिला जात आहे.