संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ खताळ     |      ऐतिहासिक शहागडावर दीपावलीनिमित्त मशाल उत्सव साजरा     |      नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |     
संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका By Admin 2025-03-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका

संगमनेर : संगमनेर शहर

व परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अर्ध्याहून अधिक रिक्षा बेकायदेशीर आहेत. अनेक रिक्षा मुदतबाह्य असून, त्यांची स्थिती खराब असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे; मात्र पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरात रोज शेकडो रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. शहरात ३०० हून अधिक रिक्षा विविध गल्ल्यांमधून प्रवासी सेवा देत आहेत. बस स्थानक परिसर, नवीन नगर रोड, अकोले रोड, चावडी, अशोक चौक, भारत चौक, गंवडीपुरा, नेहरू चौक, रंगारगल्ली, स्वातंत्र्य चौक, हॉटेल काश्मीर समोर अशा विविध ठिकाणी रिक्षा थांबे आहेत. येथे मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या असतात व त्याद्वारे हजारो नागरिक प्रवास करतात.

शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यातील अनेक रिक्षा मुदतबाह्य असूनही खुलेआम रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक रिक्षा नादुरुस्त असूनही त्या गर्दीतून

प्रवाशांची वाहतूक करत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आरटीओ प्रशासन आणि पोलिसांनी शहरातील सर्व रिक्षांची तपासणी करून बेकायदेशीर रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शहरातील काही रिक्षा चालक पेट्रोल महाग असल्याने सीएनजी गॅस व लहान गॅस टाकीचा अवैध वापर करत आहेत. हा प्रकार पूर्णतः बेकायदेशीर असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या रिक्षांमधून प्रवास करत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करत असून, यामुळे अनेकदा वाद होतात. प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या काही रिक्षा पोलिसांनी पूर्वी जप्त केल्या होत्या. मात्र, नंतर लिलावाद्वारे या रिक्षा विकल्या गेल्या व त्या पुन्हा वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. नागरिकांनी अशा रिक्षा नष्ट करण्याची मागणी केली आहे.आरटीओ व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.