अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले     |      संगमनेरमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये वाद, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुलेसह १० जणांवर गुन्हा दाखल!     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |     
जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच By Admin 2025-04-15

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2024 मध्येच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मिळवला आहे या योजनेमधूनच जवळेकडलग ते वडगाव लांडगा या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला होता अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे व विष्णुपंत  रहाटळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कातोरे व रहाटळ म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्तार आणि मोठा आहे. या तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्ती करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी दिला आहे. सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासातून संगमनेर तालुका हा प्रगतशील तालुक्यांमध्ये ओळखला जातो आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून वडगाव लांडगा ते जवळे कडलग या रस्त्या करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून निधी मिळवला आहे. ज्या रस्त्यांची कामे करावयाची आहे त्या सर्व रस्त्यांचा निधी हा लोकनेते थोरात यांनीच मिळवला आहे. 
विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी आर्थिक वर्ष 2024 - 25 यासाठी कोणताही निधी मिळवलेला नाही किंबहुना झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संगमनेर तालुक्यात काहीच निधी मिळाला नाही. असे पहिल्यांदा घडले आहे की संगमनेर तालुक्याच्या विकास कामांकरता निधी मिळाला नाही.
खरे तर विद्यमान लोकप्रतिनिधी हे सत्ताधारी पक्षाचे आहे परंतु त्यांची त्या पक्षात काही चालत नाही. वडगाव लांडगा येथे येऊन बाराशे कोटींच्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली. बाराशे कोटींचा निधी मिळवला कधी त्यामध्ये कामे कोणती आहेत हे मात्र कुणाला कळायला मार्ग नाही. 
नवीन लोकप्रतिनिधींना निवडून येऊन अजून सहा महिने झाले नाही तर बाराशे कोटी मिळवले कधी किंवा कोणत्या योजनेतील मिळवले त्यांनी ते जनतेला सांगितले पाहिजे विनाकारण दिशाभूल करू नये असेही रहाटळ यांनी म्हटले आहे 

चौकट
रस्त्याच्या कामासाठी निधी हा लोकनेते थोरातंकडून - डीएम लांडगे

लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वांचे हक्काचे नेतृत्व आहे वाडी वस्तीच्या विकास कामासाठी आम्ही त्यांच्याकडे हक्काने निधी मागतो. दिवाळीपूर्वी 2024 मध्ये या कामासाठी त्यांनी निधी दिला आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न घेऊ नये असे ज्येष्ठ कार्यकर्ते डीएम लांडगे यांनी म्हटले आहे