नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
आ. सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा By Admin 2025-05-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




आ. सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

संगमनेर (प्रतिनिधी)--नाशिक- पुणे महामार्ग लगत असलेल्या व तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. यामुळे या परिसरात सुशोभीकरणासह  भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण होणार आहेत.

वेल्हाळे परिसरातील हरीबाबा हे प्रसिद्ध देवस्थान असून कारखाना, मालदाड,सायखिंडी, गुंजाळवाडी व परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. येथे होणारी भव्य जत्रा व विविध कार्यक्रम लक्षात घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. नाशिक पुणे महामार्ग लगत असल्याने व भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी वर्षभरात हजारो भाविक येत असतात. दरवर्षी येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.परंतु या ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते.

त्यामुळे या परिसराच्या विकासाबरोबर हरिबाबा मंदिर देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाल्यास या ठिकाणी सुशोभीकरणासह सर्व सुविधा निर्माण करण्यात येतील याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन समिती कडे 30 जानेवारी 2025 रोजी पत्र देऊन क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी केली होती.  याचबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्र बाबतचा प्रस्तावही सादर केला होता . त्यानंतर ही या कामासाठी आमदार सत्यजित तांबे आणि सातत्याने पाठपुरावा केला.

आज अहिल्यानगर येथे  झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला क तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

यामुळे आता हरी बाबा मंदिर परिसरात सुशोभीकरणासह विविध सुविधा निर्माण  होणार आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून हरिबाबा देवस्थानला  क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याबद्दल वेल्हाळे, हरी बाबा देवस्थान ट्रस्ट, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी ,अमृतनगर ,गुंजाळवाडी, चिकणी ,राजापूर ,क-हे, सुकेवाडी यांसह परिसरातील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे  यांचे अभिनंदन केले आहे.

चौकट

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हरिबाबा देवस्थानचा विकास करणार -- आमदार सत्यजित तांबे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी वेल्हाळे सह विविध गावांमध्ये सातत्याने विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत .तालुक्यांमधील खांडेश्वर, निजरनेश्वर ,बाळेश्वर, रामेश्वर, दुधेश्वर, साकुर ,तळेगाव यांच्यासह विविध देवस्थानांचा पर्यटन विकास अंतर्गत मोठा विकास साधला आहे. वेल्हाळे येथील हरीबाबा हे तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हरीबाबा देवस्थान परिसर सुशोभीकरणासह  येणाऱ्या भाविकांसाठी अद्यावत सुविधा निर्माण करण्यासाठी काम असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.