दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मुंबईतील जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकी नंतर आ.अमोल खताळ यांची माहिती
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली.या बैठकीत जल संपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठारभागाला दिलासा मिळणार आहे.
चौकट
निमगाव भोजापूर धरणाची उंची, पाणी नियोजन, व्यवस्थापन संदर्भातही चर्चा झाली असून, त्यातून पाणी मिळव ण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.निळवंडे डावा व उजवा कालवा, तसेच राहठीचा दरा येथे धरण बांधण्या च्या बाबतही विचार सुरू आहे. “तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की पाण्यापासून वंचित राहणार्या सायखिंडी, कऱ्हे व इतर सर्व गावाचा सर्वे करून भविष्यात एकही गाव पाण्यावाचून राहणार नाही, यासाठी जलसंपदामंत्री विखे पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील राहू असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा व जलसंपदाच्या प्रमुखआधिकार्याच्या समवेत बैठक झाली या बैठकीतमोरवाडी धरणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली मात्र हे मोरवाडी धरण होऊ नये यासाठी इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी खोडे घालून ठेवले होते त्यामुळे आजपर्यंत ते धरण झाले नाही मात्र मोरवाडी धरण झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मात्र या परिसरात सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बॅरेंज बंधाऱ्यांचा पर्याय पुढे आला आहे हे बॅरेज बंधारे मोरवाडी साकुर जांबुत आणि शिंदोडी येथील घोडी किती वेळ असे बंधारे करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेले आहेत मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या माध्यमातून साखर पठार भागाचा सिंचनाचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल
श्री गुलाब भोसले
तालुकाध्यक्ष भाजपा
- रऊफ शेख,
- महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य,