नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला By Admin 2025-06-16

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले लोकार्पण शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची झाली गैरसोय दूर

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचेऔचित्य साधत  जनतेसाठी खुला करण्यात आला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळला होता यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी  गैरसोय झाली होती. या पुलाचे काम करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.  या पुलाचे काल लोकार्पण  करण्यात आले. यावेळी बोलताना  अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हल गर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. यामुळे दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसा च्या दिवशी, या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पणही झाले, हा एक सकारा त्मक योगायोग ठरला असल्याचे आमदार  खताळ यांनी सांगितले.                      म्हाळुंगी नदीचा पूल पडला असल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाचीपाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला. 

   या लोकार्पण सोहळ्याला आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे  शिरीष मुळे , अविनाश थोरात ,कैलास लोणारी, कैलास वाकचौरे रामभाऊ राहणे संदीप देशमुख सागर भोईर अल्पना तांबे उषा कपिले कांचन ढोरे कावेरी नवले दिपाली वाव्हळ रेखा गलांडे पुनम अनाप दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी लखन घोरपडे सौरभ देशमुख शौकत  जहागीरदार कैलास कासार संपत गलांडे राहुल भोईर शशांक नामन सुशील शेवाळे मुजफ्फर जहागीरदार सुयोग गुंजाळ तुषार ठाकूर या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत मामा अजित गुंजाळ  गौतम शाह शैलेश मंडलिक  जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

चौकट : आम्ही कायम जनतेसोबत-आ खताळ

संगमनेर शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन घोडेकर मळा भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने याभागात विकासाची कामे आणखी गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत."