राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी     |      संगमनेर 2.0 जनतेच्या सहभागातून तयार होणार जाहीरनामा - आ. सत्यजीत तांबे यांची घोषणा - संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा      |      ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात     |      महायुती मधून सौ. रेखा गलांडे यांचे नाव आघाडीवर*      |      अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची     |      संगमनेर आता ड्रग्सच्या विळख्यात धोकादायक अवैद्य धंद्यांची नव्याने भर पोलीस कारवाईत २.२३ लाखांच्या मुद्देमाल जप्त     |      लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत केली होती चिंता व्यक्त     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |     
राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी By Admin 2025-11-10

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

संगमनेर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. यातच नव्या जुन्यांचा बाद उफाळून आल्याने अर्ज दाखल करण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणूक रंगात येताना, आता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि. ४ तारखेला जाहीर केला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बाट पाहणारे इच्छुक उमेदवार थेट मैदानात उतरले, संगमनेर शहरात महायुती, महाविकास आघाडी, स्थानिक विकास आघाडी, शहर विकास आघाडी की पक्ष, यावर काहीच हालचाल अद्याप सुरू झाली नाही. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकही नाराज झाले आहे. यात नगराध्यक्ष पद महिला राखीय असल्याने सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी त्यावर दावा सांगितला आहे. सत्तेचा मोह सुटणे अवघड असल्याने संभाव्य चोका टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी व इच्छुकांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.माजीमंत्री बाळासाहेब

थोरात आता उमेदवारी देताना काय भुमिका घेतात,

मविआतील घटक पक्षांना कसा न्याय देतात, तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे कशाप्रकारे निवडणुकीलासामोरे जातात. यावर निवडणुकीची खरी दिशा ठरणार आहे. अनेकांना उमेदवारीचे बाशिंग बांधले गेले आहे. तर काहींनी प्रभागात गाठीभेटी घेऊन प्रचाराची रंगीत तालिमही सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीला निवडणुका नेमक्या कशा लढवायच्या, यानाचत बरिष्ठ पातळीवरून कुठल्याच प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता उमेदवारी नेमकी कोणाकडून करायची, असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे.

जागा वाटपाचा तिढा; सत्तेसाठी स्वतंत्र लढा

Special Offer Ad