दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
नाशिक- पुणे रेल्वेच्या संगमनेर मार्गासाठी राजकारण न करता सहभागी व्हावे
संगमनेर (प्रतिनिधी) -- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महा रेल्वे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून त्यांना पैसेही दिले मात्र सरकार बदलले आणि आता शिर्डी वरून रेल्वे मार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्ग बदलण्या पाठीमागे महायुती मधील सत्ताधारी जबाबदारी असून आता राजकारण न करता संगमनेरकरांच्या या आंदोलनामध्ये सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन रेल्वे जनआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे जाणार असल्याचे सांगितल्यानंतर संगमनेर तालुक्यासह सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड मंचर या सर्व तालुक्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने संगमनेर करांना एकत्र करून मोठे जण आंदोलन उभारण्याचा निर्धार केला. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने पाठिंबा दिला .आणि संगमनेर तालुक्यामध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली. याचबरोबर डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन पिटीशन सुद्धा दाखल करण्यात येत आहे.
संगमनेर मध्ये मोठी बाजारपेठ असून शैक्षणिक व मेडिकल हब आहे. व्यापाराच्या दृष्टीने आणि औद्योगिक करण्याच्या दृष्टीने नाशिक पुणे रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासाठी सातत्याने विकासाच्या योजना राबवून तालुक्याला राज्यात अग्रगण्य बनवले .याचबरोबर काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, तालुक्याच्या उत्तरेच्या बाजूने समृद्धी महामार्ग, नव्याने प्रास्तावित सुरत हैदराबाद महामार्ग, निळवंडे ,धरण कालवे, हायटेक इमारती याचबरोबर नाशिक पुणे महामार्गाची चौपदरीकरण व आता कॉंक्रिटीकरण पूर्णत्वास येत आहे. या सर्वांमध्ये नाशिक पुणे रेल्वे साठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आपण सातत्याने पाठपुरावा केला असून या पुढील काळात ही रेल्वे संगमनेरूनच गेली पाहिजे या करतात या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे.
रेल्वे मार्गाची दिशा बदलल्यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. महायुती सरकारचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व विद्यमान संगमनेरचे लोकप्रतिनिधी हे मात्र या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत. विधानसभेत प्रश्न मांडू असे म्हणून काही होणार नाही .ही रेल्वे कोणामुळे शिर्डी मार्गे गेली हे सर्व जनतेला माहीत आहे मीत्यामुळे राजकीय पत्रक बाजी न करता या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
चौकट