दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
क्रिकेटचा थरार संगमनेरकरांना अनुभवायला मिळणार
संगमनेर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील 25 वर्षापासून जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय टी - 20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून यावर्षी 1 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाची भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी T 20 क्रिकेट स्पर्धा ही राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेचे हे 26 वे वर्ष आहे. यावर्षी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची नियोजन करण्यात येत असून आयपीएल व राज्य पातळीवर खेळणाऱ्या विविध खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये राहणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3 लाख रुपये तर द्वितीय बक्षीस 2 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर तृतीय, चतुर्थ आणि वैयक्तिक बक्षिसांचाही समावेश आहे. या स्पर्धेसाठी अद्यावत ग्राउंड तयार करण्यात आले आहे.टर्फ विकेट, लश ग्रीन ग्राउंड,युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण, क्रिक हिरोज व लाइव स्कोर प्रत्येक संघाला ड्रेस कोड,शंभर किलोमीटर बाहेरून येणाऱ्या संघाची राहण्याची जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था अशा अद्यावत सुविधा राहणार असून एमसीएचे मान्यता प्राप्त पंच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 32 संघांना प्रवेश असलेली ही स्पर्धा नॉक आउट पद्धतीने खेळवली जाणार आहे.
गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. मागील वर्षी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी भारताचे माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावर्षी सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते व क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेच्या सहभागाकरता क्रिकेट संघांनी आपली नावे अंबादास आडेप 9881013320, संदीप लोहे 9970371777, आसिफ तांबोळी 9822500828,गिरीश गोरे 7020185131 यांच्याकडे नोंदवावी