दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर जवळील सुकेवाडीत सुमारे 300 किलोहून अधिक गांजा पकडला अंदाजे किंमत 50 लाखांहून अधिक..
संगमनेर- संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी गावात नाशिक येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स व संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 300 किलोहून अधिक गांजा पकडला असून त्याची अंदाजे किंमत 50 लाखांहून अधिक असल्याचे समजते या प्रकरणातील आरोपीचे नाव तुषार उत्तमराव पडवळ उर्फ दमल्या असे असून त्यांनी त्याच्या घरातच सदरचा हा गांजा लपून ठेवला होता उर्वरित गांजा त्याच्या घरासमोरच उभ्या असलेल्या अपे रिक्षात ठेवल्याचे आढळून आले या छाप्या प्रसंगी नाशिक पुणे व श्रीरामपूर येथील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले ग्रामीण भागात एवढी मोठी कारवाई पहिल्यांदाच झाल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरचा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याच्या वडिलांची कसून चौकशी करत आहेत घटनास्थळी नाशिक येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही दाखल झाली आहे