संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      संगमनेरात वॉर्ड रचनेच्या कामाला गती !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |     
पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी अन्यथा लढू – भाऊ जाखडी By Admin 2025-02-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी अन्यथा लढू – भाऊ जाखडी

संगमनेर (प्रतिनिधी) नियोजित पुणे-नाशिक रेल्वेच्या सरळ मार्गात कोणताही बदल न करता ती  संगमनेर मार्गेच व्हावी अन्यथा आम्ही सर्व संगमनेर निवासी त्यासाठी प्राणपणाने लढू” असा इशारा पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष  भाऊ जाखडी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 
“पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात अभ्यास पूर्ण मत मांडणारी सर्व मंडळी सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण आणि पुणे अशा सरळ मार्गाचे समर्थन करीत आहेत. असे श्री जाखडी यांनी पत्रकात म्हंटले आहे. न्याय्य भूमिकेसाठी आपण हा लढा तीव्र करणार आहोत. म्हणजे संगमनेर साठी अनुकूल नक्कीच ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास वाटतो असे त्यांनी म्हंटले अआहे. 
नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर- चाकण - पुणे हा सरळमार्ग सोडून शिर्डी-अहिल्यानगर मार्गे पुणे-नाशिक रेल्वे नेण्याचा जो घाट घातला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे मध्यरेल्वे व्यवस्थापकांनी नवीन मार्गाचा डीपीआर आराखडा  तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याच स्पष्ट केल्यावर तर  आता आम्हांला लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे.
पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास ७०-८० किमी आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास दीड तास जास्त आहे. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास "सेमी हायस्पीड" हा मूळ उद्देशच फोल ठरेल.पुणे - नाशिक - मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणे गरजेचे आहे.
GMRT मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे.पुणे - नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगीकरण व शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. पुणे - अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाही, मात्र ती पुणे - नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नाही.” शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार या सगळ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी हा मार्ग अति महत्त्वाचा आहे. असे जाखडी यांनी पत्रकात शेवटी म्हंटले आहे.