दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर शहरात कत्तलखान्यावर छापा ! 1200 किलो गोमांस सह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर प्रतिनिधी दि. 27
जमजन कॉलनी, गल्ली क्र.9, संगमनेर येथे अब्दुलसमद कुरेशी त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवले आहेत व कत्तल करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने जमजम कॉलनी येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेले व 4 -5 इसम हे गोवंश जनावरांची कत्तल करत असताना मिळून आले.पथकाने घटनाठिकाणी छापा टाकतेवेळी काही इसम हे पळून गेले. घटनाठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मुनावर मेहबुब कुरेशी, वय 40, रा.जमजम कॉलनी, गल्ली क्र.2, संगमनेर जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीस पळून गेलेल्या इसमांची नाव विचारले असता त्याने त्यांची नावे 2) अदनान साऊद कुरेशी (फरार) 3) तबरेज याकुब कुरेशी (फरार) दोन्ही रा.भारतनगर, संगमनेर 4) इतर दोन पळून गेलेल्या इसमांची नावे माहित नाही असे असल्याचे आरोपीकडे घटनाठिकाण कोणाच्या मालकीचे आहे व गोवंश जनावरांची कत्तल कोणाच्या सांगण्यावरून केली असल्याची माहिती विचारता त्याने 5) अब्दुलसमद जावेद कुरेशी, रा.भारतनगर, संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) याचे असून त्याचे सांगण्यावरून गोवंशी जनावरांची कत्तल केलेबाबत सांगीतले.पथकाने घटनाठिकाणावरून 3,60,000/- रू किं.त्यात 1200 किलो गोमांस, 60,000/- रू किं.त्यात तीन गोवंशी जातीचे कालवडी, 2,000/- रू किं.वजन काटा, 700/- रू किं. लोखंडी कुऱ्हाड व सुरा व 5,00,000/- रू किं. टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-14-एफटी-1450 असा एकुण 9,22,700/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 133/2025 बीएनएस 2023 चे कलम 271, 325, 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.