दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने काही दिवस थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पुन्हा पुर्ववत सुरू केली आहे. दिल्ली नाका परिसरातील उर्वरित अतिक्रमनांवर पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरविण्यात आला, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने महिन्यापूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार होते, मात्र बरेच दिवस झाले तरी, काम झाले नाही. परिणामी काही नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले. यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेचा काही उपयोग झाला नाही.दिल्ली नाका परिसरात कुरण रोड कडे जाणार्या वळणावरील अतिक्रमणे काढल्यानंतर राहिलेले अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेवर नागरिकांनी दबाव आणला होता. अखेर याची दखल घेत, अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकारी व कर्मचार्यांनी मंगळवारी सकाळीच पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरुवात केली.