काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद
By Admin 2025-03-14
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद
संगमनेर : अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली केली आहे. आरोपीकडून देवीच्या मुर्तीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि इतर सोन्याचे दागीने असा एकूण 24,94,000 रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त करण्यात आली आहे.
8 मार्च रोजी संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात मंदिराचा दरवाजा आणि गाभाऱ्याचे कुलुप तोडुन देवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली होती. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे लोणी ते कोल्हार रोडवर सापळा लावून आरोपीना अटक केली आहे.