नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार By Admin 2025-03-13

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

संगमनेर : पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात काल सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जीव गेला. गेल्या काही दिवसांतील याच परिसरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

दीड दोन महिन्यापूर्वी रान गव्याचा देखील अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. महामार्ग बांधताना वन्यजीवांना जाण्या – येण्यासाठीचा भुयारी मार्ग न ठेवल्याने आजवर अनेक वन्य जीवांचा या महामार्गाने प्राण घेतला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या पुणे नाशिक महामार्ग ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी महामार्गावरून एकामागे एक वेगाने वाहने जात होती. अशातच महामार्गावर आलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यानंतर बिबट्या तेथेच जागेवर कोसळला. रस्त्याच्या मधोमध बिबट्याचे धूड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग झाली. वाहनांतील प्रवासी आणि आजूबाजूचे लोक मृत बिबट्याला पाहण्यासाठी त्याभोवती गोळा झाले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. अखेर डोळासने पोलीस दूरक्षेत्राला अपघाता बाबतची माहिती कळविण्यात आली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बिबट्याचे धूड महामार्गातून बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरळीत झाली.

डोंगरदऱ्या, नद्यांचा परिसर, लपण्यासाठी आवश्यक असलेली ऊस शेती यामुळे संगमनेर तालुक्यात बिबट्यांसह अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. पुणे नाशिक महामार्ग नव्याने बांधण्यात आला त्यावेळी वन्यजीवांना जाण्या येण्यासाठी भुयारी मार्गिका ठेवणे अत्यंत आवश्यक होते. परंतु तशी व्यवस्था न केल्याने आजवर अनेक वन्यजीवांचा वाहनांच्या धडकेत बळी गेला आहे. ज्यावेळी एखाद्या प्राण्याचा बळी जातो, तेव्हा पूर्वी झालेली चूक दुरुस्त करून महामार्गावर वन्यजीवांसाठी भुयारी मार्गिका कराव्यात अशी मागणी पुढे येते. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे वाहनांच्या धडकेत वन्य जीवांचा बळी जाण्याच्या घटनाही थांबत नाहीत.

कृष्णेतील विसर्गावेळी साखर कारखान्यांकडून नदीत दूषित पाणी सोडण्याचे प्रकार, हजारो माशांबरोबरच जलचरांचा मृत्यू

अर्थसंकल्पात नवीन महाबळेश्वर प्रकल्पासह पर्यटनाला चालना