शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात.. By Admin 2025-05-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात..

संगमनेर  : संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे (ता. संगमनेर) येथील पाबळपठार भागात वादळाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यामुळे १२ आदिवासी कुटुंबांची घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे.

 या घटनेत एकूण १० लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

पाच ते सहा दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि अधूनमधून अवकाळी पावसाचे सत्र सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून यामुळे शेतमाल, घरबांधणी आणि जनावरांचे देखील मोठे नुकसान होत आहे. पाबळपठार परिसर हा डोंगर उतारावरील अतिदुर्गम भाग असून येथे वास्तव्यास असलेली आदिवासी कुटुंबे मजुरीवर उपजीविका करत आहेत. वादळामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले, काहींच्या घरांच्या भिंती पूर्णतः कोसळल्या. घरात ठेवलेले कपडे, धान्य, भांडीकुंडी, यांनाही वाऱ्याचा फटका बसला. अनेक कुटुंबांनी आरडाओरड करत घराबाहेर धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अंदाज नोंदवला. त्यानुसार एकूण १० लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्याच्या इतर भागांतही या वादळी हवामानामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळबागांना देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेकदा अवकाळी पावसामुळे शेतकरी व गरीब कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

डिग्रस गावात विजेचा कहर, दोन गायी ठार

Special Offer Ad