नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
संगमनेरात गुटख्यासह ४ हजारांची रोकड जप्त By Admin 2025-05-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात गुटख्यासह ४ हजारांची रोकड जप्त

संगमनेर : अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून नऊ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर शहरानजीक शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील शहरानजीक असलेल्या एका टपरीमध्ये बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी रात्री या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

पोलिसांनी या ठिकाणाहून हिरा पान मसाला, रॉयल ७१७ तंबाखु, केशर युक्त विमल पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, व्ही १ सुगंधीत तंबाखू, आरएमडी पान मसाला, गोल्ड तंबाखू, शीट्स ९९९ तंबाखू, एम सुगंधीत तंबाखु, असा सुमारे पाच हजार रुपयांचा गुटखा व चार हजार रुपयांची रोकड जप्त केली.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुनील मालनकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रशिद गुलाब पठाण (रा. मोगलपुरा), आफ्रिदी रफिक पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.