संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      संगमनेरात वॉर्ड रचनेच्या कामाला गती !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |     
संगमनेरात वॉर्ड रचनेच्या कामाला गती ! By Admin 2025-06-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




जुन्या वॉर्ड रचनेवरून नवीन वॉर्ड रचनेचा केला श्रीगणेशा

संगमनेरः 
नगरपरिषद
आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना संगमनेरात गती आली आहे. नगरपालिकेने वार्ड रचनेच्या दृष्टीने उपनगरातील अस्तित्वात असलेल्या पूर्वीच्या वााँची रचना लक्षात घेऊन, नव्याने तयारीचा श्रीगणेशा केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये होणार आहेत. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर विशेष तयारी सुरू झाली आहे. विशेषतः वार्ड रचनेबाबत नगरपालिकांना सूचना देण्यात आल्याने संगमनेर नगरपालिकेचे शहरातही अधिकारी कर्मचारी सध्या वार्डाचा आढावा घेत आहेत. नव्याने वार्ड रचना करण्यास सांगितल्याने पूर्वीच्याच वार्ड स्वनांचा आधार घेत, यामध्ये बदल केला जात आहे. वार्ड रचनेसाठी कालावधी  अतिशय कमी असल्याने कमी वेळेत हा वार्ड रचनेचा प्रस्ताव शासनाला सादर करावयाचा आहे. या नवीन वार्ड रचनेनुसारच या निवडणुका होणार आहेत. माजी नगरसेवकांना सुरक्षित बार्ड
शोधावे लागणार आहेत. महिला पुरुष असे दोन गट एका वार्डात आहेत. सध्या १४ वार्ड संगमनेर शहरात अस्तित्वात असल्याने २८ उमेदवारांना संधी मिळणार आहे.

अनेकजण पक्षांतराच्या तयारीत!
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी काही इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे, मात्र काँग्रेस वगळता महायुतीत सध्या तरी शांतताच आहे. भाजप काय भूमिका घेतो, यावरचं पुढील रणनिती अवलंबून असणार आहे. शिवसेनेचा आमदार असल्याने त्यांना निवडणुकीत ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यामुळे तिकीट मिळविण्यासाठी अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा झडत आहे.

इच्छुकांवर सुरक्षित वार्ड शोधण्याची वेळ !

संगमनेर शहरात महाविकास आघाडी व महायुती हे दोन्ही पक्ष या निवडणुकीसाठी रंणांगणात उतरले आहेत. विशेषतः काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने, त्यांनी कामाला गती दिली आहे, मात्र महाविकास आघाडीची यावाचत अद्याप फारशी तयारी दिसत नाही. अशातच भाजप-शिवसेनेसह राष्ट्रवादीमध्ये तिकीट वाटपाबाबत मात्र मोठा गोंधळ उडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आमदार शिवसेनेचा असल्याने त्यांना झुकते माप द्यावा लागणार आहे, परंतु याबाबत काय निर्णय होतो, यावरच पुढील रणनिती अवलंबून असणार आहे. यामध्ये भाजप कितपत सहकार्य करतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संगमनेर नगर परिषदेने वार्ड रचना करताना, मोठे बदल करणार असल्याने नगरसेवकांची अडचण निर्माण होणार आहे. वार्ड तुटणार आहे. यामुळे सुरक्षित बार्ड शोधण्याची वेळ इच्छुकांबर आली आहे.