नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू ! By Admin 2025-06-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




दूधगंगा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे न्यायासाठी साकडे

संगमनेर :

दूधगंगा पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष भाऊसाहेब कुटे व त्याच्या कुटुंबीयानी बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे. त्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कसून चौकशी करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळून द्यावे, अशी मागणी दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी सर्व ठेवीदार दूधगंगा पतसंस्थेसमोर

सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटींचा अपहार झाला आहे.

या अपहारामागे पतसंस्थेच्या चेअरमनसह मॅनेजर व इतर २१ आरोपी सिद्ध झालेले आहे.

ठेवीदारांना ठेवी परत मिळत नसल्याने गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुला मुर्लीचे शिक्षण, त्यांचे लग्न कार्य, आजारपण, दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून २ हजार ठेवीदारांचे कष्टाचे, मेहनतीचे पैसे दुधगंगा पतसंस्थेत अडकलेले आहे. वारंवार चकरा मारून देखील पैसे दिले जात नाही. त्यामुळे ठेवीदारांचे

दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, लग्न कार्ये, घरातील आजारपणासाठी लागणारा खर्च इत्यादी कामासाठी पैसे मिळत नाही. या गोष्टीला कंटाळून आत्तापर्यंत १० ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. काहीजण आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना पाठविण्यात आल्या आहेत.