गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |     
गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू By Admin 2025-07-11

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कॉन्ट्रॅक्टर आर एम कातोरे पिता पुत्रासह तिघांवर गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 11
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडला वाबळे वस्ती कडे जाणाऱ्या कॉर्नर जवळील गटार साफ सफाई करताना दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला होता आणि एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी आज पहाटे कॉन्ट्रॅक्टर रामहरी मोहन कातोरे तसेच निखिल रामहरी कातोरे आणि मुश्ताक शेख या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.गुरु पौर्णिमेच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमध्ये अतुल रतन पवार (वय 19 वर्ष राहणार संजय गांधी नगर वडार वस्ती संगमनेर) आणि रियाज जावेद पिंजारी (वय 21 राहणार मदिनानगर संगमनेर) या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर एक जण जखमी झाला होता.सदर प्रकरणी अमजद बशीर पठाण, स्वच्छता निरीक्षक संगमनेर नगर परिषद यांनी फिर्याद दिली असून गटार साफसफाईचे काम करताना असलेले नियम पाळण्यात आले नाहीत. तसेच करारात केलेल्या अटी व शर्तीचे उलन केले आणि आरोग्य विभागाची पूर्व परवानगी न घेता मजुरांना गटार साफसफाईच्या कामास लावले व मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत झाले असल्याच्या फिर्यादीवरून वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.