विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह By Admin 2025-07-04

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.



पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदनेश्वर विद्यालयाची एम.एच. १४ बी.ए. ८९३२ क्रमांकाची बस साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुल दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईट गटारात पलटी झाली.अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हवालदार अमित महाजन आणि डोळासने महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटावरील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरांमधील शाळांमध्ये आणण्यासाठी अनेक शाळा प्रयत्नशील असतात, मात्र या स्कूल बसेस शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते.

सद्यस्थितीत अनेक स्कूल बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात, तसेच वाहनांच्या देखभालीसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण होते. परिवहन विभागाने आणि आरटीओने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसेसची कसून तपासणी करणे, त्या सुसज्ज आहेत की नाही याची खात्री करणे, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.









Special Offer Ad