दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची
संगमनेर (प्रतिनिधी)--चाळीस वर्ष हा तालुका आपण परिवार म्हणून सांभाळला. वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र आता कधी न येणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेर मध्ये येऊ लागले आहेत. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू केले आहेत. अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. या पाठीमागे कुणाचा आशीर्वाद आहे हे ओळखा ,अमली पदार्थांच्या वाढलेल्या तस्करी मागे हप्ते खोरी हे एकमेव कारण असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते यावेळी मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सौ कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे , डॉ. जयश्रीताई थोरात , शंकरराव खेमनार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.