दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
निष्ठावंतांचा घात करणाऱ्या आ. अमोल खताळ यांच्या विरोधात शिवसेना ,भाजप मधूनच कार्यकर्ते एकवटले
संगमनेर-संगमनेर नगरपालिकेची निवडणूक आरोप प्रत्यारोपंच्या गदारोळीमुळे चरण सीमेला पोहोचली असून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करणा-या शिवसेनेच्या उमेदवार व आमदार अमोल खताळ यांच्या कुटुंबातील सदस्या (भावजई) यांचे नाव दुहेरी मतदार म्हणून असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर काही महिला कार्यकत्बीनी आक्षेप घेतला असून निवडणूक निर्णय अधिकान्यांपुढे त्या आपला दुहेरी मतदाराचा विषय कायदेशीर चाब म्हणून पुढे आणणार असलल्याने निवडणूक अधिकाऱ्यापुढे आता वेगळाच पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे श्रीमती सुवणी खताळ यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संगमनेरच्या राजकारणात घराणे शाही चा आरोप करत बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात धूम धडाका करून आमदारकी मिळवणारे शिवसेनेचे अमोल खताळ यांनी आमदारकी मिळवली त्यानंतर शिवसेना, भारतीय जनता पक्ष गोटातील निष्ठावंत कार्यकत्यांना आता आपली वेळ आली असून नगरपालिका निवडणुकीत आपल्याला प्राधान्य दिले जाईल असा ठाम विश्वास होता मात्र आ. अमोल खताळ यांनी या सर्व कार्यकत्यांचा राजकीय घात करुन आपल्याच कुटुंबातील सुचणी खताळ यांना उमेदवारी बहाल करून निष्ठावंत कार्यकत्यांचा एक प्रकारे विश्वासघात केला त्यामुळे अशा सर्व नाराज कार्यकत्यांचा मोहोळ खताळ्यांच्याच विरोधात सर्व प्रभागातून हळूहळू पुढे येत असून असून निवडणूक रिंगणात आता मोठी धूमचक्री निर्माण होत आहे उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरलेल्या संगमनेर सेवा समिती यांना पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजप शिवसेना निष्ठावंतांचा घात करणाऱ्या आमदार अमोल खताळ यामुळेच अडचणीत येणार हे आता स्पष्ट होत आहे. महिला कार्यकत्यी सुषमा तबरेज, सुजाता देशमुख, रेखा गलांडे, सी कानफाटे व इतर कार्यकर्त्यानी खताळ यांच्या विरोधात चंग बांधला असून त्यांना आता आम्हीच धडा शिकवू असा इशारा दिला आहे, संगमनेर सेवा समितीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ. सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा, सी. दुर्गाताई तांबे यांचा आशिर्वाद असुन आमदार सत्याजीत तांबे हे स्वतः प्रचाराची जबाबदारी पुर्णत्वास नेत असल्याचे चित्र संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना उभारी देणारी ठरत आहे. संगमनेरची पुढील ५० वर्षाची दिशा ठरवण्याचे आणी शहर विकास करण्याचे अनेक उपक्रम करण्याची त्याची रूपरेषा आहे.