अहो, संगमनेर मध्ये चाललय काय     |      वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा     |      अमली पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुणाई, घातक अमली पदार्थांचे धंदे करणारे व करवणारे यांच्या पर्यत पोलिसांचे हात पोचणार काय ?     |      संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ हे हिंदुत्वाचे वाट लावणारे सौ वैशाली तारे     |      दुहेरी मतदारांमध्ये सुवर्णा खताळ यांचे नाव हा कायदेशीर मुद्दा पुढे येत असल्याने वातावरण ढवळून निघत आहे      |      संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित     |      संगमनेर मध्ये निवडणुकीच्या धामधुमीत कारमधून 1 कोटी रोख रक्कम जप्त     |      संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगावात कौतुक     |      नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली     |      राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी     |     
अहो, संगमनेर मध्ये चाललय काय By Admin 2025-11-22

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




वाढलेली गुंडागर्दी व अमली पदार्थांचे तस्करीमुळे नागरिक चिंताग्रस्त

संगमनेर ( प्रतिनिधी ) सुसंस्कृत व वैभवशाली अशी ओळख असलेले संगमनेर शहराला मागील एक वर्षापासून दृष्ट लागली असून मागील एक वर्षात हे शहर असुरक्षित आणि अशांत झाले आहे. याचबरोबर मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांची वाढलेली तस्करी ,गुंडागिरी ,दादागिरी कोयता गॅंग यांची दहशत यामुळे संगमनेर मधील नागरिक चिंताग्रस्त झाले असून संगमनेर मध्ये चाललय काय असा प्रश्न सर्व विचारत आहेत.

स्वतःच्या विकास कामातून सुसंस्कृत आणि वैभवशाली ठरलेले संगमनेर ही सर्व नागरिकांच्या राहण्यासाठीचे पहिले पसंतीचे ठिकाण. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये अनाधिकृत फ्लेक्स बाजीसह अनाधिकृत अवैध धंदे वाढले असून यामुळे तरुणाईचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जातीपातीच्या नावावर राजकारण सुरू असून मोर्चे आणि धार्मिक वातावरण यामुळे समाजामध्ये ध्रुवीकरण झाले आहे.

याचबरोबर संगमनेर मध्ये खुलेआम ड्रग्स, नशीली गोळ्या, नशीली सिगारेट, अमली पदार्थ, हुक्का मोठ्या प्रमाणावर सापडला असून संगमनेर मधील तरुणाईचे भविष्य अंधकारात दिसू लागले आहे. खेडोपाडी ही या अमली पदार्थांचे लोन पसरले असून अनेक ठिकाणी ते सहज उपलब्ध होत आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांच्या हातामध्ये हे पदार्थ जात असल्याने नागरिक व पालक मोठे चिंतेत आहे. या अशांततेने आणि अमली पदार्थांच्या तस्करीने शहर व तालुक्यातील जनता अत्यंत चिंताग्रस्त असून नुकतीच पोलिसांनी संगमनेर मध्ये 43 लाख रुपयांचे एमडी या अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या वाहनास पकडले आहे.

यापूर्वी असे आमली पदार्थ संगमनेर मध्ये कधीही नव्हते. बाहेरच्या तालुक्यांमधून आता सर्रासपणे संगमनेर मध्ये अमली पदार्थांचे तस्कर येऊ लागले आहेत. धार्मिकतेच्या नावावर राजकारण करू लागले आहे. ते कोण आहे ते आता सर्व संगमनेर शहरवासीयांनी ओळखले आहे राजकीय आश्रयाखाली संगमनेर मध्ये अशांतता निर्माण केली जात आहे.

पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क काम करत आहे. पण वाढलेली दादागिरी दहशत इतकेच नव्हे तर दोन दिवसापूर्वी घुलेवाडी परिसरामध्ये कोयता गँगने हाणामारी केली. काही ठिकाणी पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार सत्ताधारी कार्यकर्ते करत आहे. हे सर्व मनाला अस्वस्थ करणारे आहे असा प्रकार संगमनेर मध्ये कधीही नव्हता असे मत ८६ वर्षीय जेष्ठ कार्यकर्ते श्रीराम गुंजाळ यांनी व्यक्त केले आहे.



सर्वसामान्य नागरिक व तरुणांना चिंता

मागील एक वर्षापासून अवैध धंदे वाढले असून यामागे राजकीय वरदहस्त आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांबद्दल विविध गटांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व बोलू लागले आहे. तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचे काम असून हे जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे असे आवाहन संगमनेर जेष्ठ नागरिक महिला संघाच्या वतीने करण्यात आले आहे.









Special Offer Ad