पुणे- नाशिक महामार्गावर पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न बाप-लेखावर गुन्हा दाखल अवैध धंद्यावर कारवाईची मागणी
By Admin 2025-12-08
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पुणे- नाशिक महामार्गावर पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न बाप-लेखावर गुन्हा दाखल अवैध धंद्यावर कारवाईची मागणी
या घटनेनंतर पठार भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर कायद्याचा धाकच न उरल्याने या भागात सातत्याने घटना घडत आहेत. घारगाव, बोटा महामार्गावरील ढाब्यांवर दिवसाढवळ्या सर्रास दारू विक्री सुरू आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा बाप-लेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली असताना, पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत होते. घारगाव येथे वाडगे याने अचानक आपली गाडी आडवी लावली. यानंतर, झालेल्या वादातून अण्णासाहेब वाडगे याने लोखंडी रॉडने पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. या हल्ल्यात अभिमन्यू मोटे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल वाडगे हे दोघेही फरार झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी माहिती दिली की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप-लेकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर यापूर्वीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.या घटनेनंतर पठार भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर कायद्याचा धाकच न उरल्याने या भागात सातत्याने घटना घडत आहेत. घारगाव, बोटा महामार्गावरील ढाब्यांवर दिवसाढवळ्या सर्रास दारू विक्री सुरू आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागातील अवैध धंदे तात्काळ आणि पूर्णपणे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.