विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले By Admin 2025-11-30

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




सतत खोटं बोलणाऱ्या ढोंगी लोकांना संगमनेरचा विकास दिसत नाही

संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शहरासाठी सातत्याने निधी आणला हायटेक बस स्थानकासह विविध इमारती उभारल्या. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध मुबलक पाणी दररोज मिळत आहे,दर्जेदार रस्ते आहे,चांगल्या सुविधा आहेत. विकासाचे सर्व मापदंड पूर्ण केले असून काय केले नाही ते सांगा असा सवाल विचारताना विरोधक ढोंगी असून त्यांना संगमनेरचा विकास दिसत नाही ते सातत्याने खोटे बोलतात अशी परखड टीका माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले असून शांत संयमी असलेले डॉ सुधीर तांबे हे पहिल्यांदा कडाडलेले जनतेने पाहिले.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक,रणजीतसिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, इसाक खान पठाण अजित ओरा यांसह सर्व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेने विकासाचे सर्व मापदंड पूर्ण केले आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना राबवून संगमनेर शहरांमध्ये पाईपलाईनचे जाळे निर्माण केले. नवीन टाक्या बांधल्या विविध वैभवशाली इमारती निर्माण केल्या. सहकाराच्या माध्यमातून बाजारपेठ फुलली शांत संयमी सुसंस्कृत शहर अशी ओळख निर्माण झाली. 35 गार्डन निर्माण केल्या नागरिकांना सर्व सुविधा दिल्या. राज्यामध्ये विकासात संगमनेर पहिल्या तीन मध्ये असून विरोधकांना संगमनेरचा विकास का दिसत नाही. हे ढोंगी लोक आहेत. असा प्रहार करताना काय केले नाही ते विचारा. स्वच्छ व पारदर्शक कारभार केला. नगरपालिकेला लौकिक मिळवून दिला असे सांगताना विरोधकांची प्रवृत्ती वाईट आहे. फ्लेक्स वर फ्लेक्स लावले जात आहेत. हे सर्व थांबवायचे आहे. जेव्हा चिलट प्राणी गडबड करतात तेव्हा सिंह बाहेर येतो असे म्हणताच  उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. शांत संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेले नेते मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे पहिल्यांदाच कडाडलेले संगमनेरच्या जनतेने पाहिले.

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपण विकासाच्या योजना राबवल्या स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही संकल्पना अत्यंत प्रभावी ठरली. यामध्ये शहरातील नागरिक व महिलांचा मोठा सहभाग राहिला. सर्व नगरसेवक नगरसेविका यांनीही मोठी साथ दिली त्यामुळे आपण विकास करू शकलो असे त्या म्हणाल्या.

तर हिरालाल पगडाल म्हणाले की,संगमनेरची सुसंस्कृत परंपरा मोडण्याचे काम काही लोक करत आहे अशा लोकांना वेळीच ठेचले पाहिजे. त्यांच्याकडे कोणतीही विकासाचे व्हिजन नाही जाती – जातीं मध्ये भांडण लावायचे आणि राजकारणाची पोळी भाजायची अशी प्रवृत्ती असणाऱ्यांना वेळीच रोखा.

Special Offer Ad