दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सुसंस्कृत संगमनेर शहरासाठी सर्व नागरिक एकवटले
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत आणि वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात विकासाच्या पायाभूत सुविधा राबविण्यात आले आहेत. सर्वांसाठी आस्तेचे आणि सुरक्षिततेचे असलेल्या संगमनेर शहरात मागील एक वर्षापासून वाढलेली गुंडगिरी दहशत थांबवण्यासाठी संपूर्ण संगमनेरकर एकवटले असून संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा वाढला आहे.
प्रभाग एक ते पंधरा मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीचे सर्व उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. याचबरोबर निघणाऱ्या रॅली पदयात्रा यांना शहरातील नागरिक महिला व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संगमनेर शहराच्या एकतेसाठी नागरिक एकवटल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, 1991 पासून संगमनेर शहराची नगरपालिका अत्यंत चांगले काम करत असून आदर्शवत योजना राबवले आहेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निळवंडे धरण 38 किलोमीटरची थेट पाईपलाईन योजनेमुळे संगमनेर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. आरो वापरण्याची गरज नाही. असे पाणी असून शांतता, सुरक्षितता यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी संगमनेर मध्ये येत आहेत मात्र मागील एक वर्षापासून चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शहराला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. थेट संपर्क आणि तात्काळ तक्रार निवारण हे वैशिष्ट्य घेऊन आगामी सेवा समितीचे सर्व उमेदवार काळात काम करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
या प्रचारादरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, सेवा समितीकडून 20 नवीन चेहरे तर 11 जुन्या अनुभवी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मा.मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा लौकिक वाढवण्याबरोबर अत्याधुनिक योजनांसह संगमनेर शहरला हायटेक बनवण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध राहतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या असून महिलांची सुरक्षितता ट्रॅफिक व धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी नियोजन आराखडा आखले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दिलीपराव पुंड म्हणाले की,जनतेचा मोठा पाठिंबा हा संगमनेर शहर जपण्यासाठी आहे. हे शहर माझे गाव आहे आणि या गावासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रत्येक नागरिकांनी दाखवले असून यापुढील काळात संगमनेर सेवा समिती शहराला अत्यंत वैभवशाली बनवेल हा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.