विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
संगमनेरात गौवंश जनावरांचे अडीच हजार किलो अवशेष जप्त By Admin 2025-02-05

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात जनावरांचे अडीच हजार किलो अवशेष जप्त

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

-शहरातील जमजम कॉलनी परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे. तब्बल अडीच हजार किलो गोवंश जनावरांचे टाकाऊ अवशेष जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली नंबर सात येथे कत्तल केलेल्या जनावरांचे टाकाऊ अवशेष विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली. याठिकाणी जाऊन कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी आपल्या पथकाला

केली. यानंतर पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल कडलग, पोलीस नाईक पांडुरंग पटेकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एका निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे टाकाऊ अवशेष दिसून आले. हे पत्र्याचे शेड व टाकाऊ अवशेष हे कोणाचे आहे याबाबत चौकशी केली असता अब्दुल हक कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) याने मुदस्सर हाजी व नवाज कुरेशी (रा. भारत नगर, संगमनेर) यांच्या सांगण्यावरून विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पथकाने हे टाकाऊ अवशेष नष्ट करून टाकले. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे



Special Offer Ad