दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?
संगमनेर-नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १ (ब), २ (ब) आणि प्रभाग १५ (ब) मधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याचे समजते आहे. येथील निवडणुक २१ डिसेंबरला होणार असून २२ डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र उर्वरीत नगराध्यक्षपदासह २७ नगरसेवक पदाची निवडणुक ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे. याबाबत संगमनेर निवडणुक आयोगाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी लवकरच याबाबत स्पष्टता येणार असल्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले. या अचानक आलेल्या निर्णयामुळे गेले काही दिवस या प्रभागातील उमेदवारांनी तयारी केली होती. यातील प्रभाग १ (ब) मध्ये सेवा समितीकडून दिलीप सहदेव पुंड विरुध्द महायुतीचे अभिजीत अरून पुंड, प्रभाग २ (ब) मध्ये सेवा समितीच्या अर्चना दिघे विरुध्द महायुतीच्या इंदिरा नामन तर प्रभाग प्रभाग १५ (ब) मधील सेवा समितीच्या पठाण नसीमबानो ईसहाकखान विरुष्द शेख सईदा गफ्फार (अपक्ष-महायुती पुरस्कृत) यांच्या निवडणुकीला स्थागिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजे ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये १० डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत तर २० डिसेंबर मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे.